आर.आर.(आबा)पाटील सुंदर गाव जिल्हास्तरीय तपासणी समितीची ग्रामपंचायत मुंडीपारला भेट

0
28

गोरेगांव : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊन निकष पूर्ण करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्याची योजना आहे. दिनांक 19 जानेवारीच्या तपासणीत तालुकास्तरावर मुंडीपार ग्रामपंचायत प्रथम क्रमांकची पात्र ठरली असून आज दिनांक 14 फेब्रुवारीला जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम कमिटीच्या वतीने ग्रामपंचायतची व संपुर्ण मुंडीपार परिसराची तपासणी करण्यात आली. त्यात जिल्हास्तरिय कमिटीने समाधान व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(नरेगा) डी.बी.हरिणखेडे ,गोरेगांव पं.स.विस्तार अधिकारी(पंचायत)जे.एन.बोरकर,
विस्तार अधिकारी (कृषी)सुमित चुनचुनवार, या ग्राम कमिटीत सहभागी होते.मुंडीपार हे गाव गोरेगांव तालुक्यात नेहमी चर्चेत असणारे गाव आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शासनाच्या निर्मल ग्राम, स्वछ ग्राम, आदर्श गाव, साने गुरुजी स्वच्छ शाळा, बचत गट स्थापन करून रोजगार निर्मिती आदीसह अनेक शासनाच्या योजनेत भाग घेतला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होणाऱ्या गावांना स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर हे निकष आहेत. यावेळी मुंडीपारच्या सरपंच प्रेमलता राऊत, उपसरपंच भाऊलाल कटरे,सचिव ए.के.साखरे,ग्रा.पं.सदस्य दिनेश दिक्षीत,ग्रा.पं.सदस्य चंद्रशेखर शहारे,ग्रा.पं.सदस्य चुन्नीलाल चाचेरे,ग्रा.पं.सदस्य जावेद खान,ग्रा.पं.सदस्या भुमेश्वरी पारधी,ग्रा.पं.सदस्या संगीता सरजारे,ग्रा.पं.सदस्या शामकला महादेव खांडवाये, ग्रा.पं.सदस्या आम्रपाली राऊत,ग्रा.पं.सदस्या माधुरी चौधरी,ग्रा.पं.सदस्या सरिता सुरजोसे, सर्व समितीचे पदाधिकारि व सदस्यगण ,जि.प.शाळा मुख्याध्यापक, व लो.टि.व्ही.विद्यालय मुख्याध्यापक,सर्व आरोग्यसेविका,सर्वअंगणवाडी सेविका,सर्व आशासेविका,गावातील सर्व बचतगटातील महिला वर्ग, गावातील सर्व भजन मंडळ व मान्यवर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.कमिटीकडून समाधान या निकषात जास्तीत जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना तालुक्यात प्रथम येणाऱ्या १० लाख रुपये पुरस्काराची योजना आहे. गोरेगांव तालुक्यात मुंडीपार ग्रामपंचायतीचा तालुक्यात प्रथम क्रमांक म्हणून पात्र ठरली असून जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतमध्ये मुंडीपार ग्रामपंचायतचा समावेश झाला होता आणि आता जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम कमिटीने पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.