कारंज्यात शनिवारपासून बैलजोडी ईनामी पटाचा महासंग्राम;2 लाखांची विविध बक्षिसे

0
29

गोंदिया, 23 फेब्रुवारी- भारतीय जनता पार्टी शेतकरी आघाडीतर्फे जवळील कारंजा येथील सिद्धांत बाबा पटांगण येथे दोन दिवशीय बैलजोडी पटस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विविध प्रकारचे 2 लाखापेक्षा अधिकचे पुरस्कार, वैयक्तिक व प्रोत्साहनपर बक्षीसे देऊन शेतकरी, बैलजोडी व कातकरास गौरवण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता खा. सुनील मेंढे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर राहतील. पटदान पूजक म्हणून आमदार, विजय रहांगडाले, माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके राहतील. पाहुणे म्हणून भाजप प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, माजी पालकमंत्री राजकुमार बडोले, प्रदेश सचिव संजय पुराम, वीरेंद्र अंजनकर, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, रमेश कुथे, विजय शिवणकर, संजय कुळकर्णी, लायकराम भेंडारकर, सविता पुराम, रुपेश कुथे, मोरेश्वर कटरे, धनलाल ठाकरे, सुनील केळनका, धनेंद्र कटरे, ओम कटरे आदी मान्यवरांची उपस्थिती राहील. रविवार 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता विजेत्या बैलजोडींना रोख पुरस्कार, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्या बैलजोडीस 31 हजार, द्वितीय 25 हजार, तृतीय 20 हजार, चतुर्थ 15 हजार, पाचवे 10 हजार, सहावे 9 हजार, सातवे 8 हजार, आठवे 7 हजार नऊवे 6 हजार, दहावे 5 हजार याशिवाय 11 ते 15 व्या स्थानी असलेल्या बैलजोडींना प्रत्येकी 4 हजार, 16 ते 20 व्या स्थानी असलेल्या बैलजोडींना प्रत्येकी 3 हजार, 21 ते 25 क्रमांकावर असलेल्या बैलजोडींना प्रत्येकी 2 हजार, 26 ते 30 क्रमांकावरील बैलजोडींना प्रत्येकी दीड हजार व 31 ते अखेरपर्यंतच्या बैलजोडींना प्रत्येकी 1 हजार रुपयाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रथम क्रमांकाचे बैलजोडीस युवा ग्राम विकास मंच, भारतीय जनता पार्टी कारंजातर्फे सायकल देण्यात येणार आहे. याशिवाय विविध प्रोत्साहनपर व वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार गोपालदास अग्रवाल राहतील. बक्षीस वितरक म्हणून जिप अध्यक्ष पंकज रहांडाले तर पाहुणे म्हणून जिप सदस्य विजय ऊईके, लक्ष्मी तरोणे, शांता देशभ्रतार, रितेश मलगाम, अंजली अटरे, दीपक कदम, भावना कदम, सीता रहांगडाले, गजेंद्र फुंडे, जीवन जगनित आदींची उपस्थिती राहील. शेतकर्यांनी बहुसंख्येने बैलजोड्या पटस्पर्धेत सहभागी करण्याचे आवाहन भाजप शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अशोक हरीणखेडे मुर्री, महेंद्र सहारे कारंजा यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.