ट्रकच्या धडकेत नीलघोड्याचा मृत्यू

0
5

देवरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर शहरापासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या हत्तीदेव फाट्याजवळ गुरुवारी पहाटे अज्ञात ट्रकने निलघोड्याला चिरडल्याने निलघोड्याचा जागीच मृत्यू झाला.
गुरुवारी पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान घडलेल्या दुर्घटनेत साडेतीन वर्षाच्या निलघोड्याला आपला जीव गमवावा लागला आहे. बातमी मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी भोगे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व पोस्टमार्टम करुन निलघोड्याला जाळण्यात आले. निलघोड्याचा पंचनामा करणारे सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग आर.एम. वर्‍हाडपांडे यांनी सांगितले की मागील तीन महिन्यात ८वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.