आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरीय सायक्लॉथॉनचे आयोजन

0
18

 गोंदिया- जिल्हा परिषद आरोग्य विभाग ,केटीएस सामान्य रुग्णालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या एकत्रित सहकार्याने जागतिक लठ्ठपणा दिन (ओबेसिटी) च्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे जिल्हास्तरीय सायक्लॉथॉन चे आयोजन 05 मार्च  रोजी करण्यात आले होते. या रॅलीतून आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सायकल रॅलीतून आरोग्य विषयक जनजागृतीचा संदेश जनसामान्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे सायकल रॅली दरम्यान उपस्थित होते.
जिल्ह्यात दिनांक 04 मार्च रोजी जागतिक लठ्ठपणा दिवस केटीएस रुग्णालय गोंदिया येथे आरोग्य विभागामार्फत साजरा करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून लोकांपर्यंत स्थूलपणा बाबतचे जनजागृती संदेश पोहोचण्यासाठी सायकल रॅली उपक्रम पार पाडण्यात आला.
सद्यस्थितीत लोकांच्या बदलत्या जीवनशैली, बैठक कामे ,मोबाईल व टीव्हीचे परिणाम मुळे लोकांनी चालणे फिरणे कमी केले आहे ,बदलत्या आधुनिक युगात लिफ्ट चा वापर वाढला आहे त्यामुळे लोकांमध्ये कमी शारिरीक हालचाली मुळे कमी वयातच मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब व इतर संसर्गजन्य आजारामुळे 63 टक्के लोक मृत्युमुखी पडत असल्याचे संशोधनामुळे निदर्शनास आलेले आहे.बहुतेक संसर्गजन्य आजार तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन, मद्यपान तसेच योग्य आहाराची कमतरता, अपुरी शारीरिक हालचाल, वायू प्रदुषण यामुळे लोकांमध्ये कमी वयातच लठ्ठपणा दिसत आहे. बालकांची सुद्धा सायकलचा कमी वापर, मैदानी खेळचा अभाव, फास्ट व जंक फूड खाण्याची सवय, कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम खाण्याची सवय वाढलेली दिसत आहे लोकांमध्ये. स्थूलपणा आजाराविषयी जनजागृती करणे हा महत्वपूर्ण संदेश सायक्लॉथॉनच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
यावेळी सायकल रॅली दरम्यान आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंपूर्ण भाग घेतला होता .त्यात डॉ. अमरीश मोहबे, डॉ. दिनेश सुतार, डॉ. स्नेहा वंजारी, डॉ. मीना वट्टी, डॉ. महेंद्र संग्रामे, डॉ. सौरभ अग्रवाल,प्रशांत खरात, मनीष मदने, संजय बिसेन, पारस लोणारे,अर्चना वानखेडे, डॉ. सुवर्णा उपाध्याय, डॉ. नम्रता दोहाते, रवींद्र श्रीवास, प्रशांत बनसोड, पियुष श्रीवास्तव, मनीषा देशमुख, कल्याणी चौधरी, महेश चुटे, मिलिंद नंदागवळी, सुनंदा रामटेके, धनलाल खडके, विवेकानंद कोरे,बालक खुशि खडके यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.