29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जिल्हा खनिकर्म अधिकारी लाच घेतांना अटक

जिल्हा खनिकर्म अधिकारी लाच घेतांना अटक

0
29

blank

 

गोंदिया,दि.12-नागपूर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गोंदिया शहरात येऊन गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा खनिकर्म अधिकारी विनय कवलोकर यांना सुमारे 2 लाख रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.ही कारवाई आज मंगळवारला सुभाष बगीचा परिसरात करण्यात आली.तक्रारदार हा रेती व्यवसायीक असून रेतीघाटासंदभार्त तक्रारदाराकडे पैशाची मागणी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी केली होती.परंतु लाच द्यायची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने गोंदियाएैवजी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.त्या आधारावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

blank