एमआयडीसी गोरेगाव येथे त्वरित सुविधा पुरवा-रेखलाल टेंभरे

0
26

गोरेगाव-गोरेगाव येथे एमआयडीसी स्थापना होऊन २५ वर्षे झाली. गेल्या २५ वर्षांत एमआयडीसी गोरेगावचा विकास झाला नसुन एमआयडीसी परिसर हा दारुड्यांचा अड्डा तर चोरीचे ठिकाण झाले आहे.या परिसरात गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे वास्तव्य झाले आहे.एमआयडीसी परिसरात पाणी, रस्ते, सुरक्षा रक्षक, स्ट्रीट लाईट व पार्किंगची व्यवस्था करण्याकडे एमआयडीसीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत सुविधा पुरवण्याची मागणी जिल्हा बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे यांनी केली आहे.

कारखानदार व व्यापारी कोणताही उद्योग/व्यापार करण्यासाठी पैशाची कितीही जोखीम घेण्यास तयार असतात. परंतु त्यांना साधने-सुविधा जसे की पाणी, रस्ते,विज, पार्किंग व अन्य आवश्यक व्यवस्था उपलब्ध हव्या असतात. एमआयडीसी गोरेगाव येथे स्ट्रीटलाईट, वाहतूक व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रेखलाल टेंभरे यांनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी यांना केली.