जामोद येथे तणाव, पोलिसांचा हवेत गोळीबार!

0
9

बुलडाणा: महाप्रसादासाठी भाकरी गोळा करीत फिरत असलेला ट्रॅक्टर अडविल्यामुळे जातीय तणाव निर्माण होऊन, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याची घटना शनिवारी रात्री येथे घडली. दगडफेकीत ९ जण जखमी झाले असून यापैकी दोन जण गंभीर आहेत. दरम्यान, गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.