नवीन उड्डाणपुलासाठी १० दिवसात निविदा काढणार, शासनाचे आश्वासन

0
20

जुन्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या जागी नवीन उड्डाणपूल निर्मितीची प्रक्रिया सुरु : आमदार विनोद अग्रवाल

 गोंदिया : गोंदिया शहराला उत्तर ते दक्षिण जोडणाऱ्या महत्वपूर्ण जुन्या रेलवे उड्डाणपूल चे निर्माण कार्य लवकरात लवकर सुरु करण्यात यावे या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्रजी चव्हाण व मुख्य अभियंता नंदनवार यांची भेट घेऊन जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी नवीन उड्डाणपुल निर्माण कार्य सुरु करणे बाबत सविस्तर चर्चा केली. आणि उड्डाणपूल विना शहरातील नागरिकांना होणाऱ्या असुविधे बाबत अवगत केले. सध्या गोंदिया शहराला उत्तर ते दक्षिण प्रवास करण्याकरिता मुख्य उड्डाणपूल आणि अंडरपास चा पर्याय आहे. पावसाळा सुरु होणार असून पावसात अंडरपास बंद राहील यामुळे मुख्य उड्डाणपूल व हड्डीटोली, रामनगर क्रोसिंग वर मोठ्या प्रमाणत गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व विषयांवर आमदार विनोद अग्रवाल यांनी सविस्तर चर्चा करत नवीन उड्डाणपूल निर्मितीची प्रर्कीया लवकरात लवकर सुरु करणे बाबत विनंती केली असता येत्या १० दिवसात निविदा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. सोबतच पुलाचे कार्य देखील लवकर सुरु करण्यात येईल जेणेकरून नागरिकांना त्रासापासून मुक्ती मिळेल. नवीन उड्डाणपूल जुन्या उड्डाणपूल सारखाच बनणार असून त्याची रुंदी ४० फुट असणार आहे ज्यामुळे दळणवळण सोप्या पद्धतीने होईल.