विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्या परिचराचा अखेर मृत्यू

0
32

गोंदिया,दि.02–तालुक्यातील ग्रामपंचायत इर्री येथे परिचर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला मागील २७
महिन्यापासून वेतन न दिल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी घडली होती.त्या रमेश नान्हू ठकरेले (४८) रा. इर्री या परिचराचा आज 2 जून रोजी उपचारादरम्यान गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला.दरम्यान महाराष्ट्र राज्य पंचायत कर्मचारी महा संघाचे राज्य कार्याध्यक्ष मिलींद गणवीर यांनी सरपंचासह सचिवावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.तर राणी अवंतीबाई लोधी महासभेच्यावतीनेही गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.