विक्की दोनोडेच्या कुटुंबियांना दोन लाखांचे धनादेश वाटप

0
7

– मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
गोंदिया- : सडक अर्जुनी तालुक्यातील राका येथे ९ मार्च रोजी शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये पडून सव्वा तीन वर्षीय विक्की खुशाल दोनोडेचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दोनोडे कुटुंबियांचे सांत्वन करून मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रूपये देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी राका येथील ग्रामपंचायत कार्यालयात विक्की दोनोडेचे वडील खुशाल दोनोडे यांना पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दोन लाखांचे धनादेश सोपविले.
याप्रसंगी प्रामुख्याने पंचायत समिती सभापती कविता रंगारी, जि. प. सदस्य माधुरी पातोडे, उपविभागीय अधिकारी बोंबार्डे, खंडविकास अधिकारी झामqसग टेंभरे, नायब तहसीलदार मेश्राम, पं.स. सदस्य राजेश कठाणे, सरपंच रेखा चांदेवार, उपसरपंच वसंत उपरीकर, कृउबास संचालक रोशन बडोले, वसंता गहाणे, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी आदी उपस्थित होते.