लग्नाच्या बसला अपघात, १४ जखमी

0
9
नागपूर – नागपूरच्या उंटखाना चौकामध्ये लग्नाच्या व-हाडाची बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.  या अपघातात १४ व-हाडी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उंटखाना चौकातून जाणा-या बसला ट्रकची धडक बसली. ट्रक बसच्या मधल्या भागावर जाऊन धडकला.