नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर शिंगोरीजवळ अंतरफलक कोसळल्याने वाहतुक ठप्प

0
4
भंडारा-गेल्या काही दिवसापासून वातावरणात सायकांळच्या वेळी होत असलेल्या बदलामूळे उन्हासोबतच सायकांळच्यावेळी वादळीवार्यासोबत पावसाचा अनुभव नागरिाकंना मिळत आहे.त्यातच आज सायकांळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदारच्या वादळीवार्यामूळे भंडारा जिल्ह्याला चांगलाच तडाखा बसला आहे.लाखनी ते भंडारा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शिंगोरी पलाडी गावाजवळ असलेला अशोका कंपनीच्या मोठ्या अंतरफलक कोसळल्याने या मार्गावरील वाहतुक चक्क कोलमडली गेली आहे.गेल्या दोन तासापासून ते फलक उचलण्याचे काम जेसीबीने सुरु आहे परंतु जेसीबीने मोठे असलेले ते नामफलक हटविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर लाबंच लाबं रांगा लागल्या आहेत.सोबतच या वायामूळे भंडारा जिल्हा परिषद अावारातील मोठी झाडे सुध्दा उल्मडून पडली आहेत.या फलकाच्या कोलमडल्याने रायपूर कडे जाणारी वाहने भंडारा जवळील टोलनाक्यापासून तिकडेच थांबविण्यात येत आहेत.तर नागपूरकडे जाणारी वाहनांची रांग धारगावकडे लांबच लांब लागली आहे.