आपत्ती व्यवस्थापनात विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची –महेशकुमार बाजीया

0
11

 जायस्वाल महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन संदर्भात जन जागृती कार्यक्रम
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे )-आपत्ती दरम्यान गरजूंना तात्काळ मदत पुरविण्यासाठी प्रशासन नेहमीच तत्परतेने कार्य करीत असते. आपत्ती काळात नागरिकांचा प्रतिसाद प्रशासनाला नेहमी लाभते. आजचे विद्यार्थी म्हणजेच उद्याचे नागरिक असल्याने विद्यार्थी जीवनात आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष महत्त्व आहे. आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना आत्मसात करून विद्यार्थ्यांच्या सहकार्याने समाजात आपत्तीची तीव्रता कमी करण्यास मदत होईल, आपत्ती काळात परिस्थितीला तोंड देण्यासाठी सुरक्षा व बचाव याबाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना तसेच समाजातील सर्व व्यक्तींना असणे आवश्यक आहे . त्याचप्रमाणे भविष्यात येणाऱ्या आपत्तीमुळे जीवहानी व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करायचे असेल, तर प्रथम प्रतिसादक म्हणून प्रत्येकाने भूमिका बजावणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणेचे पोलीस निरीक्षक मा.मुकेश कुमार बाजिया यांनी केले.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे आणि शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय, अर्जुनी मोरगाव यानी संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ऑक्टोबर रोजी जायस्वाल महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईश्वर मोहूर्ले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या जनजागृती कार्यक्रमात व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहुर्ले , अर्जुनी मोरगाव येथिल तहसीलदार मा. अनिरुद्ध कांबळे, गोंदिया जिल्हा शोध व बचाव पथकाचे प्रमुख श्री नरेश उईके व त्यांची चमू , राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे यांची चमू , मा श्री परिहार आणि कार्यक्रमाचे समन्वयक प्रा पंकज उके उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत एक आव्हान नावाचा कार्यक्रम राबविला जातो. त्यात आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद संदर्भात निर्माण होत असलेल्या अडचणींना कसे तोंड द्यावे आणि स्वतःचे तसेच समाजाचे जीवित व आर्थिक नुकसान कमीत कमी करण्याचे प्रशिक्षण घेऊन समाजसेवा करावे, असे आवाहन याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मा. प्राचार्य मोहुर्ले यांनी उपस्थित यांना केले. यादरम्यान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल च्या चमूने प्रात्यक्षिका सह विविध प्रकारच्या आपत्ती विषयक बाबींचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तहसील कार्यालयाचे कर्मचारी, तलाठी व अन्य अधिकारी आणि विद्यार्थी बहुसंख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्राध्यापक पंकज उके यांनी, संचालन प्रतीक चव्हाण यांनी व आभार प्रदर्शन कुमारी वैष्णवी सूर्यवंशीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पंकज उके, डॉ. डी एल चौधरी, प्रा. अजय राऊत, डॉ. नितीन विलायतकर, प्रा. सुमेध मेश्राम, वैभव कापगते, कु किरण देशमुख, कु माधवी ब्राम्हणकर, सुहास राऊत आणि सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.