प्रवासी निवाऱ्याखाली दबून मुलीचा मृत्यु

0
13

देवरी,(ता.30) –  देवरी-आमगाव राज्यमार्गावरील देवरी पोलीसस्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोहारा येथील प्रवासी निवाऱ्याखाली दबून १६ वर्षीय मुलगी जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवारला सायकांळी ६ वाजता दरम्यान घडली.

सविस्तर असे की, देवरी-आमगाव राज्य मार्गावरील लोहारा (सुरतोली) येथील चौकात असलेल्या प्रवासी निवाऱ्यात आपल्या वडीलांची वाट बघत मनिषा देवाजी भोयर रा फुटाणा ,ही मुलगी बसली होती. त्याचवेळी त्या चौकात असलेल्या एका टॅकचालकाने  ट्रक क्र.(सीजी ०४,जेडी ७९२९) रिव्हर्स घेताना प्रवासी निवाऱ्याला धडक दिली.  या धडकेत प्रवासी निवाराच पूर्णतः जमीनदोस्त झाला.  त्या प्रवासीनिवाऱ्याच्या ढिगाऱ्याखाली मनिषा दाबली गेली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यु झाला. मनिषाचे वडील देवाजी भोयर हे मुलीला लोहारा बसस्थानकात सोडून आपल्या भावाला हरदोली येथे सोडायला गेले होते. ते परत येईपर्यंत या अपघातात तिचा मृत्यु झालेला होता. ट्रक  चालकाचे नाव विनोद मोहन लटये, राह. लोहारा असे असून देवरी पोलीसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.