खासगी प्रवासी बसला ट्रकची धडक

0
10

देवरी-ककोडी-चिचगड-देवरी मार्गावरील वडेकसा वळणावर  गुरुवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास बस आणि ट्रकची अमोरासमोर जबर धडक झाली. या घटनेत बसमधील २0 पेक्षाही अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. वाहनचालक संदेश भगवान यादव (२२) रा.सिवंदरपूर बालिया हा गंभीर जखमी झाला. जखमींना उपचारासाठी ककोडी येथील प्राथमिक आरोग्य वेंष्ठद्रात भरती करण्यात आले. अपघाताची भिषणता लक्षात घेता कसलीही जीवित हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
छत्तीसगड राज्यातील छुरियावरून  गुरुवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास एक खासगी ४0सिटर प्रवासी बस (क्र.सी.जी. 0८/एम ३८२) ककोडी-चिचगड मार्गे देवरीकडे येत होती. दरम्यान देवरीकडून छुरियाकडे सी.जी. 0४/जेसी-८३५७ क्रमांकाचा ओव्हरलोड ट्रक जात असताना बस आणि ट्रकची अमोरासमोर धडक झाली. ही घटना चिचगड-ककोडी दरम्यान वडेकसा वळणावर घडली. या घटनेत खासगी बसमधील २0 पेक्षाही अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले असून वाहनचालक संदेश भगवान यादव (रा.सिवंष्ठदरपूर बालिया) हा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच चिचगड पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात भरती केले. दरम्यान सहषराम कोरोटे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी बळीराम कोटवार, चैनसिंग मडावी, जिवनलाल सलामे या कार्यकर्त्यांना पाठवून जखमींना मदत करण्याची सूचना दिली. पोलिसांनी घटनेची नोंद करून वाहनचालक संदेश भगवान यादव (२२) रा.सिवंदरपूर बालिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे देवरीपासून जवळच वाघनदी येथे आरटीओ चेकपोस्ट आहे. देवरीकडून छत्तीसगडकडे जाणारे ओव्हरलोड ट्रक आर.टी.ओ. चेकपोस्टचा कर वाचविण्यासाठी मुख्य मार्गाने न जाता छुरिया मार्गाचा वापर करतात.