पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती

0
14

गोंदिया : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची २९१ वी जयंती मंगळवार (दि.३१) जिल्हा धनगर समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश पाटील होते. उद््घाटन सहायक पोलीस निरीक्षक आर.एम.न्यायदे यांच्या हस्ते झाले. अतिथी व वक्त म्हणून केंद्रप्रमुख एल.एफ. गिर्‍हेपुंजे, माणिक गेडाम उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छाने न करता रोपटे देवून, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत करण्यात आला. याशिवाय अनेक उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर माणिक गेडाम यांनी प्रकाश टाकला. गिर्‍हेपुंजे यांनी त्यांचे धार्मिक शिक्षण व आली शिवभक्ती यावर प्रकाश टाकला. तर न्यायदे, युवराज घोडे, सेवकराम डोकरे यांनी स्त्री शक्ती वाढावी यासाठी स्त्रियांनी अहिल्यादेवीचा इतिहास व देश कार्यापासून प्रेरणा घ्यावी, असे सांगितले. मुख्याध्यापिका पाटील व बुचे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन जगदीश पडोळे यांनी केले. आभार संदीप झिलपे यांनी मानले.