एलईडी लाईटचे लोकार्पण

0
9

तिरोडा-नगर परिषदेतील विद्युत बिल कमी यावे यासाठी न.प. कार्यालया समोरील भाजी बाजारात एलईडी लाईट लावण्यात आले. त्याचे लोकार्पण आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते, नगराध्यक्ष अजय गौर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी बांधकाम सभापती विजय बन्सोड, न.प. सद्य सलीम जवेरी, रार्जशी उपवंशी, राखी गुणेरिया, ममता हट्टेवार, जोत्सना शेंडे, नरेश धुर्वे, उमाशंकर हारोडे, भाऊराव कठाने, स्वानंद पारधी, सलाम शेख, सारंग मानकर उपस्थित होते. संचालन संजय नागपुरे यांनी केले. आभार देवा तिवडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व नगर परिषद सदस्यांनी सहकार्य केले.