खडसेंच्या राजीनाम्याचे मलकापूर व जळगावमध्ये पडसाद

0
11
जळगाव/मलकापूर, दि. 04 – महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची  बातमी कळताच जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर मलकापूर येथे  जोरदार पडसाद उमटले. खडसेंचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगरात कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करीत जाळपोळ केली. तसेच कडकडीत बंद पाळला. तुलनेत जळगाव शहरात शांतता होती. सकाळी पक्षाच्या बळीराम पेठेतील जिल्हा कार्यालयात शुकशुकाट होता. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे सुध्दा खडसे यांच्या समर्थनात मोठा विशालकाय मोर्चा काढून राजीनाम्याची विरोध करण्यात आला.खडसे यांच्यावर जाणिवपुर्वक आरोप लावण्यात आल्याचा या मोचेर्कयाचा आरोप होता.