बदलीनंतरही वित्तविभागाचे पंधरे तळ ठोकून

0
9

बदलीनंतरही वित्तविभागाचे पंधरे तळ ठोकून

सीईओ म्हणतात कुणालाही प्रतिनियुक्ती नाही

गोंदिया-जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने नुकतेच ग्रामविकास मंत्रालयाच्या सुचनेनुसार सर्व विभागातील बदलीपात्र कर्मचारी अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आले.जे कर्मचारी अधिकारी मुख्यालयी अधिक काळापासून कार्यरत आहेत त्यांना मुख्यालयातून हलविण्यात आले.त्या सर्वांना 31 मे रोजी कार्यमुक्त करुन बदलीच्या ठिकाणी रुजु होण्यासाठी मोकळे करण्यात आले.त्यानुसार काही अधिकारी कर्माचारी हे मोकळे होऊन आपल्या नव्या बदलीच्या ठिकाणी रुजू झाले.त्यातच वित्त विभागातील श्री पंधरे हे सुध्दा 31 मे रोजी कार्यमुक्त झाले.परंतु कार्यमुक्त झाल्यानंतरही मुख्य लेखा वित्त अधिकारी रा.मा.चव्हाण यांनी पंधरे यांना आपल्या कार्यालयात कार्यरतच ठेवल्याचे प्रतिनिधीला दिसून आले.जेव्हा की सीईओ डाॅ.पुलकुंडवार यांच्याशी बेरार टाईम्सने चर्चा केली असता कुठल्याही बदली पात्र कर्मचार्याची प्रतिनियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही.आणि अशा कुठल्याही फाईलवर आपण स्वाक्षरी केलेली नाही.प्रतिनियुक्तीसाठी अद्याप कुणाचाही विचार केलेला नसल्याचे आणि गरज असल्यास आयुक्तांच्या परवानगीने कारवाई होणार असे सांगितले.त्यातच पंधरे हे गोरेगाव पंचायत समिती येथे रुजु झाले परंतु तिथे काम न करता ते रुजु तारखेपासूनच वित्त विभागात ठाण मांडून बसले असून त्यांच्या टेबलावरील गर्दी बघितल्यास मोठ्याप्रमाणात कंत्राटदाराची बिले काढण्याचा सपाटा कार्यमुक्तीनंतरही सुरु असल्याचे प्रत्यक्ष बघावयास मिळाले.त्यातही वित्त लेेखा अधिकारी चव्हाण यांचीही भूमिका संशयास्पद वाटत आहे.कार्यमुक्त कर्मचार्याला जबाबदारी कशी दिली नव्हे तर आज अर्थ समितीच्या बैठकीलाही पंधरे यांना चव्हाण यांनी सोबत बसविले होते.दरम्यान गोरेगावचे बीडीओ हरिणखेडे यांना विचारणा केली असता त्यांनी पंधरे रुजू झाले परंतु सद्या कार्यालयात येत नसल्याचे सांगत ते गोंदियात काम करीत असल्याची चर्चा आपणाकडे एैकावयास मिळाल्याचे सांगितले.