मुलचेरा बसला अपघात, प्रवासी जखमी

0
8

मुलचेरा(गडचिरोली),दि.८: गडचिरोली  जिल्ह्यातील  लगाम येथून मुलचेऱ्याकडे जाणार्या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली गेल्याने बसमधील ५ ते ६ प्रवासी जखमी झाल्याची घटना आज बुधवारला(दि.8) दुपारी घडली.

आज दुपारी एम.एच. ०७-सी ९४६५ क्रमांकाची बस मुलचेरा येथून लगाम येथे गेली होती. परतीच्या प्रवासात बस मल्लेरा ते विश्वनाथनगरदरम्यानच्या चाची नाल्याजवळ पोहचताच रत्यारील ओल्या मातीमुळे घसरुन रस्त्याच्या खाली गेली. यामुळे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. भारत संचार निगमतर्फे केबल टाकण्याचे काम सुरु असून, त्यासाठी त्यांनी नाली खोदली आहे. मात्र नालीतील माती रस्त्यावरच आहे. अलिकडेच पाऊस आल्याने माती ओली झाली. त्यामुळे बस घसरुन रस्त्याच्या कडेला गेली.