रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

0
8

ब्रम्हपुरी,दि.8- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड- सिंदेवाही तालुक्यातून जाणार्या रेल्वेच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. बल्लारपूर-गोंदिया रेल्वेमार्गावर असलेल्या आकापूर फाट्याजवळ ही घटना घडली आहे. मृत बिबट ही मादा असून तीचं वय अंदाजे एक ते दिढ वर्ष असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. बुधवारी सकाळी या मार्गाने जाणाऱ्या बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजर गाडीने या बिबट्याला धडक दिली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. बल्लारपूर-गोंदिया रेल्वेमार्ग हा अतिशय घनदाट जंगलातून जात असून या मार्गावर या आधी देखील अनेक वन्यप्राणी रेल्वेच्या धडकेने मारल्या गेले आहे.  या भागात रेल्वेचा वेग नियंत्रित ठेवण्याच्या रेल्वेविभागाला सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आज झालेल्या बिबट्याच्या मृत्यूमुळे रेल्वे कडून वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे उघड झाले आहे.