जिल्हा बँकेकडून २१० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप

0
8

भंडारा:बँका पिककर्ज देण्याकरिता सकारात्मकता दाखवत नसताना जिल्हा सहकारी बँकेने पीक कर्ज वाटप करीत राज्यात अव्वल ठरली आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत २१० कोटी रूपयांचे ४६ हजार ९७६ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे. या जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे हे यशस्वी धुरा सांभाळत आहेत.

भंडारा जिल्ह्यातील ४६ शाखांमधून ३६८ सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या हिताकरिता प्राथमिकता देत शिखर बँक, नाबार्ड शासन यांनी आखून दिलेले निर्देश समोर ठेऊन उद्दिष्ठ गाठत आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांना शासनाने ४९५ कोटी वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यात ४१ टक्के जिल्हा सहकारी बँक ५९ टक्के इतर बँकांना पीक कर्ज वाटपाचे कर्तव्य सादर केले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी सातही तालुक्यात पीककर्ज मेळावे घेत पीककर्जाची व्यापकता वाढविली आहे.

पिककर्ज वाटपात ओलीताला १६५०० तर कोरडवाहूला १३५०० रुपयाचे प्रमाण निश्चित केले आहे. पिककर्ज वाटप स्वनिधीतूनच सुरु असून शिखर बँकेला १३५ कोटी पिककर्ज वाटपाकरिता मागणी केली आहे.