सहा केंद्राचा परवाना रद्द तर २९ कृषी केंद्रांची विक्री बंद

0
25

भंडारा : खरीप हंगामाला प्रारंभ होत असताना कृषी विभागाने जिल्ह्यातील ३५ कृषी केंद्रांवर कारवाई केली. यात २९ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश बजावले आहे. तर सहा कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आले.
जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगामात बि-बियाणे व खतांचा पुरवठा करता यावा, यासाठी कृषी विभागाच्या अखत्यारित कृषी केंद्र सुरू आहेत. जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक केली आहे. खरीप हंगामाला सुरूवात होत असल्याने या भरारी पथकाने कृषी केंद्र तपासणी केली असता भंडारा जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता आढळून आली.
यात काही कृषी सेवा केंद्रधारक विना परवाना कृषी निविष्ठा विक्री करीत होते. तपासणीत खते, बियाणे व किटकनाशके विक्रीचा परवाना नसतानाही अनधिकृतरित्या विक्रीचा व्यवहार सुरू असल्याचे आढळून आले. यामुळे भरारी पथकाने २९ कृषी केंद्राचे परवाने विक्री बंद करण्याचे आदेश बजावले आहे.