संत रविदासांची काव्यरचनेतुन महान सामाजीक क्रांती:- चंद्रशेखर ठवरे

0
5

अर्जुनी मोर.P आपल्या काव्याचे माध्यमातून संत रविदास यांनी मानवता व बंधुत्वाची शिकवन दिली.इ.स.१५ ते १६ व्या शतका दरम्यान संत रविदास भक्ती चळवळीचे भारतिय रहस्यवादी कवी होते, संत रविदास यांनी जाती आणी लिंगयांचेमधील सामाजिक भेदभाव मिटविण्यासाठी कठोर प्रयत्न केले.त्यांनी भारतभर फिरुन महान सामाजीक कार्य केले.ते सुधारक संतामधे अग्रणी होते. चर्मकार समाजबांधवानी शिक्षण ,व्यवसाय करुन स्वावलंबी बनावे यासाठी ते झटले,संत रविदासांनी काव्यरचनेतुन महान सामाजीक क्रांती केली असल्याचे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांनी केले.
चर्मकार समाज संघटना बोंडगावदेवी येथे ता.२४ आयोजीत संत रविदास महाराज जयंती निमित्त कार्यक्रमात ठवरे बोलत होते.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद पाऊलझगडे, अभय फुल्लुके, से.नि.पशुधन विकास अधिकारी डाॅ. वाघाये, काॅग्रेसचे संभाव्य लोकसभा उमेदवार डाॅ. चंद्रकांत निंबार्ते, प्रकाश रामटेके, पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे, सुनिल लुटे, उल्हास भालेराव, रामप्रसाद बरैय्या, भाऊदास बरैय्या, व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम संत रविदास महाराज यांचे यांचे पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून जयंती समारोहाला सुरवात करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी संत रविदास यांचे जिवनावर प्रकाश टाकला. संचालन व आभार पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे यांनी केले. जयंती समारोहाला चर्मकार समाज बांधव व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.