जिल्हा परिषद मोरगाव शाळा तालुक्यात तृतीय

0
13

अर्जुनी मोर.- राज्य शासनातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा- सुंदर शाळा अभियान राबविण्यात येत आहे या अभियानात अर्जुनी मोरगाव तालुक्यातून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव या शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे हे अभियान राज्यभरात १५ फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात आले या अभियानात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता या अभियानाच्या माध्यमातून शाळेने अधिक प्रभावी विस्तार होण्याची या दृष्टीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन अध्यापन प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ,पर्यावरण संवर्धनाची जाणीव ,विद्यार्थ्यांचे आर्थिक व्यवस्थापन, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य ,राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणे अशा अनेक उद्दिष्टावर काम करीत सदर शाळेने तालुक्यातून तृतीय क्रमांकाचे एक लक्ष रुपयाचे बक्षीस पटकावलेले आहे. सदर शाळा उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असून अर्जुनी/मोर चे काही शिक्षक कर्मचाऱ्यांनी आपल्या पाल्यांचे नाव सदर शाळेत दाखल केलेले आहे .दरवर्षी प्रमाणे सुरू शैक्षणिक सत्रात एन.एन.एम.एस. परीक्षेत १०विद्यार्थी उत्तीर्ण झाले हे उल्लेखनीय आहे.यापूर्वी गतवर्षी सदर ‘शाळा आमची शाळा आदर्श शाळा ‘हे अदानी फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सुद्धा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला होता हे विशेष !त्यासाठी अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी निमजे गटशिक्षणाधिकारी ऋषीदेव मांढरे, वरिष्ठ विस्तार अधिकारी अनिल चव्हाण ,केंद्रप्रमुख सु.मो. भैसारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्वर शहारे, सरपंच गीताताई नेवारे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तानाजी लोधी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश लाडे, पोलीस पाटील रमेश झोडे आणि गावकऱ्यांनी मुख्याध्यापक रेखा गोंडाने व शिक्षक वृन्दाचे अभिनंदन केले व उज्जवल भविष्याची कामना केली.