अर्जुनी मोर. – महाराष्टाला संत महापुरुषांचा वारसा लाभला आहे. माणसाला जगण्याची कला संत साहित्यातुनच मिळते.राष्टसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगितेतुन महान सामाजीक क्रांती केली. ग्रामगीता म्हणजे सुसंस्कारीत पिढी घडवणारी कला आहे. कर्मयोगी गाडगे महाराज यांनी किर्तनाचे माध्यमातून मोठी सामाजिक क्रांती केली.व स्वच्छतेचे धडे दिले.प्रत्येक मानवाने संत महापुरुषांचे साहित्य वाचुन आपली प्रगती करावी.कारण संतांच्या साहित्यातच मानवाचे कल्याण आहे असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषद चे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांनी केले.
तालुक्यातील इंजोरी येथे आयोजीत राष्टसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगे महाराज यांचे पुतळ्याचे अनावरन प्रसंगी ते उदघाटक म्हणुन बोलत होते.यावेळी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स.सभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोळे, पं.स.सदस्य संदिप कापगते, पुष्पलता दृगकर,माजी सरपंच रविंद्र खोटेले, सरपंच कुरुंदाताई वैद्य, उपसरपंच काशिनाथ कापसे, सरपंच सरिता राजगीरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी, डाॅ.कुंदन कुलसुंगे, पोलीस पाटील डाकराम मेंढे, महामंत्री लैलेश शिवनकर, लालाजी शिवनकर, मुख्याध्यापक विठोबा रोकडे, सहा.शिक्षक लाखेश्वर लंजे,माजी सरपंच जितेंद्र शेंडे,पांढरवानीचे सरपंच दयाराम लंजे, व अन्य मान्यवर उपस्थित होते. इंजोरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रमुख प्रवेशद्वाराला लागूनच जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर, लैलेश शिवनकर, दयाराम लंजे, जितेंद्र शेंडे यांचे सहयोगाने राष्टसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगे महाराज यांचे पुतळे दान करण्यात आले. या महापुरुषांचे पुतळ्याचे अनावरन गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांचे हस्ते विधीवत पुजाअर्चा करुन करण्यात आले. संचालन सहा शिक्षीका नमिता लंजे तर आभार पुस्तोळे मॅडम यांनी केले.