महिलांना सन्मान देणारा भारत सर्वाना मिळून बनवायचा आहे : डॉ.प्रविण तोगडिया

0
8

गोंदिया : आज समाजात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. आरोग्या विषयी जनजागृती गरजेचे आहे हळूहळू देश बदलत आहे. महिलांच्या विकासाकरिता शिक्षण ,रोजगार व सुरक्षा या तीन बाबींवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे सोबतच आत्मसुरक्षाचे धडे महिलांना दिला पाहिजे. महिलांनी रोजगार व स्वयंरोजगारासाठी पुढे यायला पाहिजे. देशात काही राज्य वगळले की हुंडाबळी चे प्रकरण आज पण सुरुच आहे ते संपले पाहिजे ज्याप्रमाने आपल्या घरामध्ये देव-देवीचा सन्मान होतो त्याचप्रमाणे समाजात पण मुली-महीलांना सन्मान देणारा देश सर्वांनी मिळूण बनवायचा आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी केले .युवापर्व सुपर वूमन व बिगबास्केट द्वारा आयोजीत सुपरवुमन अवार्ड 2024 च्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हातील विविध क्षेत्रातीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान डॉ.प्रवीण तोगडीया व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष मोतीलाल चौधरी ,राष्ट्रीय महिला परिषदेचे अध्यक्ष अस्मिता ताई भट्ट ,महिला अर्बन बँकेच्या अध्यक्ष डॉ माधुरी नासरे,उपकार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग शिखा पिपलेवार ,सोनेरी पहाट संस्थेच्या अध्यक्षा रेखा भोंगाडे सिंधी समाज गोंदिया महिला अध्यक्षा कांचन ठकरानी ,विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय संपर्क प्रमुख शुभांगी मेंढे जेष्ठ समाजसेविका डॉ.सविता बेदरकर,सोनाली खोब्रागडे,डॉ.रितू चौधरी , गोंदिया पब्लिक स्कूल च्या प्राचार्या रिंकू बैरागी, सुपर वूमनच्या संचालिका प्राची गुडधे ,युवा पर्व समूहाचे संचालक प्रमोद गुडधे,आंतरराष्ट्रीय विश्व हिंदुपरिषदेचे जिल्हाध्यक्ष त्रिलोक शेंडे व्यासपीठावर उपस्थित होते.
युवा पर्व सुपर वुमन व बिंग बास्केट गोंदिया द्वारे ‘आज के डान्सिंग सुपरस्टार’ चे आयोजन करण्यात आले हाते या स्पर्धेला गोदियाकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोन्ही गट मिळून 90 पेक्षा जास्त स्पर्धकांनी यामध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन सादर केले. उशिरा पर्यंत चाललेल्या या स्पर्धेत सोलो डान्स स्पर्धेत स्मिती चौधरी प्रथम क्रमांक, द्वितीय शर्वरी कोठेवार तर प्रोत्साहन पर याशमी पटले यांनी पटकाविला तर डुएट डान्स स्पर्धेत मोनिका पटले व रामेश्वरी पटले प्रथम तर राणी आपुलकर व कावेरी आपुलकर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेमध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह देवून त्यांचे प्रोत्साहन वाढविण्यात आले. या स्पधेचे परीक्षण नागपूर येथील डान्स प फैशन कोरियोग्राफर कल्पना पराते व शिखा पिल्लारे, डान्स कोरियोग्राफ. गोंदिया यांनी केले.सदर कार्यक्रमाला 500 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी हजेरी लावली यावेळी त्यांच्या करीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सहयोग हॉस्पिटलच्या चमूने सर्वांची तपासणी केली.येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जास्त जास्त मतदान करावे याकरिता येणाऱ्या प्रत्येकांना जनजागृति पर बॅच लावून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन स्वाती बिसेन यांनी केले तर आभार सुनीता ठाकूर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी सुपर वूमन च्या जिल्हा संयोजिका संध्या डोंगरवार ,जिल्हा कार्यकारी सदस्य सुनीता ठाकूर,समीक्षा पटले ,मनीषा महेशगवळी ,मीना टेंभरे,हिरल गुडधे,पार्थ दियेवार,धैर्य टिकारिया,नीता शेंडे,वोपली वैद्य,सुषमा आमकर,रेणुका कुंजाम,याशिका धामडे,नितु पाराशर, प्रीती गुप्ता , संतोषी रहांगडाले,सुनीता लष्करे ,कल्पना गोरखे, सुरेखा गायधने,अंजली शहारे , संतोषी रहांगडाले, पिंकी मोटवानी,नेहा कटियारे , किरण उंबरानी, सुषमा पिल्लारे , सुषमा कारंजेकर,मीना कोटेवार,हर्षा माइन्दे व सर्व सुपर वूमन सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.