मतदान जनजागृती पोस्टरद्वारे आरोग्य विभागाची जनजागृती

0
4

गोंदिया,21 मार्च– लोकशाही बळकट करण्यासाठी आगामी निवडणुकीत मतदानाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवित आहे.
ग्रामीण व शहरी भागात गाव पातळीवर मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रतिक नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांनी कंबर कसली असून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे सर्व विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहे.
सार्वत्रिक निवडणुक 2024 “स्वीप” कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृती आरोग्य विभागाला तालुका आरोग्य अधिकारी व जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील बाह्यरुग्ण विभागात भिंतीवर लावण्यासाठी भिंतीपत्रके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांनी जिल्हा आरोग्य विभागाला उपलब्ध करुन दिले आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांची “स्वीप” निवडणुक जनजागृती नोडल अधिकारी बाबत मतदानाबाबत महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात नाविण्यपुर्ण उपक्रम राबवुन जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा आरोग्य प्रशासनाला मताधिकार जनजागृती चे भिंतीपत्रके पोष्टर्स वितरित करण्यात आले आहे. सदर स्टीकर्स आठ्ही तालुक्यातील आरोग्य संस्थाना वितरीत करण्यात आले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी सुद्धा वैद्यकिय अधिकारी यांना मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आचार संहिता कार्यप्रणालीचे भंग न करता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
लोकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आरोग्य विभाग सुद्धा सरसावला असुन आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्या नियमित आरोग्य कार्यक्रमासोबत मतदान जनजागृती करीत आहे.. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांची दूरदृष्टी नाविन्यपूर्ण उपक्रम यावर जनजागृती होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.