जगत महाविद्यायात ‘राष्ट्रीय जल दिवस’ व ‘राष्ट्रीय वन दिवस’ उत्साहात

0
4

गोरेगांव- स्थानिक जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरीहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयात  २२ मार्च २०२४ रोज शुक्रवार ला ‘राष्ट्रीय जल दिवस’ व ‘राष्ट्रीय वन दिवस’ कार्यक्रमाचे संयुक्तरीत्या आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. नीलकंठ लंजे व आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. संजीव राहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतीशास्त्र विभाग व आयक्यूऐसी द्वारे आयोजीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एच. भैरम यांनी भुसविले. आपल्या संबोधनातुन त्यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे, वन्य जीवांचे व वन्यफळांचे महत्व पटवून दिले. वनस्पतीशाश्त्र विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार राणे यांनी वन व जल विषया संबंधी तसेच भारतीय वनांच्या प्रकारांची माहिती सादरीकरणातुन विशद केली. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. बी‌. जी. सूर्यवंशी व डॉ. संदीप राहांगडाले यांनी सांभाळले तर सुत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. कु. हर्षा मानकर यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. एस.टी.नंदेश्वर, प्रा. जे. आय. ठाकुर, प्रा. कैलाश जाधव तसेच कर्मचारी व्रूंद आणि विद्यार्थी यांनी आपली उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे शेवटीं कु.आचल ठाकरे हीनी सर्वांचे आभार मानले.