देवरी येथे लोकसहभागातून गाळ उपसले

0
9

देवरी- राष्ट्रीय महामार्गानजिक असलेल्या मॉं धुकेश्वरी मंदिर परिसरातील तलावाचे गाळ लोकसहभागातून काढण्याला शुक्रवारी (ता.17) रोजी सुरवात करण्यात आली.
या मोहिमेची सुरवात देवरीच्या नगराध्यक्ष सुमन बिसेन यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी देवरीचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार संजय नागतिळक,उपनगराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रवीण दहिकर, महेश जैन, प्रशांत संगीडवार, प्रमोद संगीडवार,माया निर्वाण, कुलदीप लांजेवार, सोनू चोपकर,दिनेश भेलावे, नेमीचंद आंबिलकर, कुवरलाल भेलावे, सुरेश चन्ने आदी मान्यवर उपस्थित होते. या मोहिमेंत देवरी गावातील सर्व तलावांचे गाळ लोकसहभागातून उपसण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकातून सांगण्यात आले.