सोलेंच्या वृक्षqदडीचे स्वागत;हाकेला मात्र भाजयुमोचा खो

0
11

गोंदिया- राज्यात १ जुलै रोजी होणाèया दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांसंदर्भात जनजागृतीच्या दृष्टिने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले यांनी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून वृक्षदिंडीसाठी पुढाकार घेतला आहे.त्यांच्या वृक्षदिंडीचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले.मात्र जेव्हा सोले भाषण द्यायला बसले तेव्हा त्यांनी भाजयुमोच्या कार्यकत्यार्ना स्वागत चांगले केले आता दोन शब्द या गुरुजीचेही एकूण घ्या असे म्हणत पेंडालच्या मागे उभे असलेल्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना विनंती केली मात्र भाजयुमो अध्यक्ष वगळता कुणीही प्रतिसाद न दिल्याने सोलेंच्या हाकेला भाजयुमोचा खो अशी म्हणण्याची वेळ आली.

या वृक्षदिंडीचे गोंदिया जिल्ह्यात आगमन झाले.तिरोडा येथे आमदार विजय रहागंडाले यांनी या वृक्षqदडीचे स्वागत केले.त्यानंतर तिथून ही वृक्षqदडी गोंदिया येथे पोचली.कुडवा नाका येथून भाजयुमोच्या कार्यकत्र्यांनी मोटारसायकल रॅलीने कालेखा चौकात ही रॅली आणली जिथे रॅलीचा समारोप करण्यात आला.याठिकाणी उपस्थितांना आ.सोले यांनी मार्गदर्शन करतांना दररोज होणारा पर्यावरणाचा èहास भविष्यात आपल्यासाठी भयावय असू शकतो यासाठी पर्यावरणाची निगा राखणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले.यावेळी खासदार नाना पटोले,आमदार विजय रहागंडाले,माजी जि.प.अद्यक्ष नेतराम कटरे,माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे,शहर भाजप अध्यक्ष सुनिल केलनका,महामंत्री रविकांत बोपचे,भाजयुमो अध्यक्ष पंकज रहागंडाले,सभापती छाया दसरे,महिला आघाडी अध्यक्ष भावना कदम,दिपक कदम,भरत क्षत्रिय,कुशल अग्रवाल,गोंदियाचे भावी आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ.सोले यांनी वृक्षलागवडीसंबधी शपथ दिली तसेच वृक्षारोपण केले.त्यानंतर ही qदडी गोरेगाव येथे पोचली तिथे पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी,उपसभापती बबलू बिसेन,भाजप अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत,मोरेश्वर कटरे,सुरेश रहागंडाले,जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे,सीता रहागंडाले,चित्रलेखा चौधरी,संजय बारेवार,भाऊलाल गौतम आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.