बियाणे कंपन्यांच्या इशारावर नाचते हवामान खाते

0
12

गोंदिया, दि. २३ : या वर्षी हवामान खात्याने दमदार पाऊस पडेल, असे संकेत दिले. त्यानुसार तीन- चार वर्षापासून निसर्गकोपाला सामोरे गेलेल्या शेतकèयांनी महागडी बियाणे खरेदी करून बहुतांश ठिकाणी पेरणीची कामे हाती घेतली. मृग कोरडाच गेला. आद्र्रा नक्षत्र लागला तरीदेखील पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पेरणी पूर्णतः करपली. दरम्यान, संतप्त झालेल्या शेतकèयांनी हवामान खाते हे थेट बियाणे कंपन्यांच्या इशारावर नाचत असल्याचा आरोप केला आहे.त्यातच महाबीजने पुरविलेले अनुदानावरील बियाणेही निकृष्ठ निघाल्याने शेतकरी वर्ग िचतेत पडला आहे.दहा दिवसांपूर्वीच पूर्व विदर्भात मान्सून येणार असे हवामान खात्याने वर्तविले होते. परंतु,मान्सून आला नाही. तर, दुसरीकडे कोकण, मुंबईकडून आपल्याकडे अद्याप मान्सून सरकलाच नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यातून हवामान खाते, कृषी विभाग शेतकèयांची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट होते. बियाणे कंपन्यांसोबत त्यांचे साटेलोटे असावे, असा आरोप जि. प. चे माजी कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी केला आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने या वर्षी खरीपात एक लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रात धान लागवड केली जाणार असल्याचे सांगितले. कृषी विभागाच्या या अंदाजाला खरे ठरविण्यासाठी शेतकèयांनी कंबरदेखील कसली. खरीपपूर्व मशागतीची कामे बायकोपोरांना घेऊन बळीराजाने आटोपली. उन्हातान्हात काम करीत असताना ङ्कुटणाèया घामाचीही तमा शेतकरी कुटुंबांनी बाळगली नाही. जमिन भूसभूसित, पेरणीयोग्य झाली. पूर्व विदर्भात दमदार पाऊस पडेल, हे हवामान खात्याचे संकेत. या संकेतानुसार, शेतकèयांनी कर्जबाजारी होऊन प्रसंगी गाठीला असलेला पैसा सोडून बि- बियाण्यांची जुळवाजुळव केली. गत वर्षीपेक्षा या वर्षी बियाण्यांच्या किमतीत बियाणे कंपन्यांनी वाढ केली आहे. तरीही खचून न जाता शेतकèयांनी एचएमटी, यशोदा, महाबीज, सोनम, कावेरी, जयश्रीराम, महागुजरात, ओम श्री, सिपना, दप्तरी, पारस अशा बियाण्यांची खरेदी केली. गोंदिया तालुक्यात पाण्याची काही प्रमाणात सोय असलेल्या बहुतांश शेतकèयांनी मृगात पेरणीची कामे आटोपली. मात्र, हवामान खात्याच्या या अंदाजाला चुकवत मृग कोरडाच गेला. आता आद्र्रा नक्षत्र लागले आहे. असे असतानाही पावसाचा पत्ता नाही. उन्हाळ्यात जसे पावसाचे चटके बसायचे अगदी तसेच चटके ऐन पावसाळ्याच्या या दिवसात बसत आहेत. शेतकèयांनी पेरलेले धान बियाणे जमिनीतच गाडले गेले आहेत. त्यामुळे शेतकèयांनी बियाणे खरेदीकरिता ओतलेला सारा पैसा व्यर्थ गेला आहे. या शेतकèयांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दरम्यान, जिल्ह्यात जवळपास २० टक्के पेरण्या आटोपल्या असल्या तरी, कृषी विभाग शेतकèयांनी पेरणीची का‘े हाती घेतली नाही, असे सांगत आहे. त्या‘ुळे कृषी विभाग शेतकèयांप्रती किती दक्ष आहे. हे दिसून येते.