टीम इंडियाला मिळाला नवा प्रशिक्षक; अनिल कुंबळे

0
9

धर्मशाळा- टीम इंडियाला नवा कोच अर्थात मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. माजी कर्णधार व फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. कुंबळे यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाल एक वर्षासाठी राहणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे अध्‍यक्ष अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी संचालक रवी शास्त्री आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी कोचपदासाठी मुलाखत दिली होती. कुंबळे व शास्त्री कोच पदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र, अखेर कुंबळे यांचीच या पदावर निवड झाली आहे.इतर दावेदारांमध्ये प्रवीण आमरे, लालचंद राजपूत, टॉम मूडी व स्टुअर्ट लॉ यांनी देखील कोचपदासाठी मुलाखती दिल्या होत्या.