खासदार पटेल,आमदार पटोले,अग्रवाल,माजी आमदार बडोले व फुकेनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क;

0
15

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कुटुंबीयांसह गोंदिया येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.आज सकाळी त्यांनी पत्नी वर्षा पटेल, मुलगी पुर्णा, व मुलगा प्रजय यांच्यासह स्थानिक एनएमडी कॉलेज येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी साकोली तालुक्यातील सुकळी या आपल्या गृहगावी सहकुटुंब मतदान केले.माजी आमदार इंजी.राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी व माजी आमदार डाॅ.परिणय फुके यांनी लाखनी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांनी खमारी येथे तर जिल्हा परिषद अध्यक्ष पकंज रहागंडाले यांनी तुमखेड बु.येथे मतदानाचा हक्क बजावला.

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ.नामदेव किरसान यांनी आमगाव तालुक्यातील रिसामा येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुनिल मेंंढे यानी भंडारा येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

प्रफुल्ल पटेल यांना मतदान केंद्रातील अव्यस्थेची व पोलीस कर्मचारी मतदारांसोबत करीत असलेल्या अरेरावीची माहिती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली. हे ऐकून पटेल यांनी त्वरित उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.मतदान केंद्रावर मतदार पावतीचे वितरण न करण्यात आल्यामुळे बहुतांश मतदारांना मतदानाचा हक्क न बजावताच परतावे लागले. याबाबतची तक्रार आपण जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

माजी मंत्री तथा भंडारा-गोंदिया विधानपरिषदेचे माजी सदस्य डॉ.परिणय फुके यांनी आज 18व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील लाखनी येथील समर्थ विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे मतदान केले.यावेळी डॉ. परिणय फुके म्हणाले, “लोकसहभाग हा एक चांगला संदेश आहे, अधिकाधिक लोकसहभाग दिसून येत आहे. मोदीजींच्या योजनांमुळे विकासाची संधी मिळाल्याने जनता आनंदी असल्याचे दिसते. “सहभाग वाढला आहे”.

गोंदिया स्थित बापूजी व्यायाम शाळा येथील मतदान केंंद्रावर माजी आमदार राजेन्द्र जैन, सौ. सुनीता जैन व निखील जैन यांनी सहकुटुंब मतदान केले.