मतदान जनजागृती एलईडी रथाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

0
6
वाशिम,दि.२२- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदान जनजागृतीसाठी एलईडी रथ तयार करण्यात आले आहे. या एलईडी रथाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले यावेळी स्वीपचे नोडल अधिकारी जीवन आढाव, जिल्हा माहिती अधिकारी यासीरोद्दीन काझी, नायब तहसीलदार सतीष काळे, सहाय्यक नोडल अधिकारी राजेश काळे, गुलाम यसदाणी आदींची उपस्थिती होती.
लोकसभा निवडणुकीत वाशिम जिल्ह्याचे मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने जिल्हाभरात जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील महिला आणि नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी तसेच इतर मतदारांनाही मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याच्या अनुषंगाने रील्स आणि सेल्फी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही वापर करण्यात येत आहे.
वाशिमकरांनी या लोकशाही उत्सवाचे जल्लोषात स्वागत करून आपल्या आपल्या अधिकाराचा वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणास सहकारी करावे असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.या एलईडी रथाद्वारे जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाचे व्हिडिओ, निवडणूक विभागाने तयार केलेल्या ये पुढे मतदान कर हे गीत तसेच वोटर हेल्प या ॲप्लिकेशनला कसे हाताळावे याबाबत प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे.