अर्जुनी मोर. :- तालुक्यातील बोंडगावदेवी येथील भुमिता भुमेश्वर लंजे वय 45 या महिलेचा विज पडुन मृत्यु झाल्याची घटना आज ता.6 जुन रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोंडगावदेवी येथील भुमिता भुमेश्वर लंजे ह्या नेहमी प्रमाणे सायंकाळच्या सुमारास घरगुती काम करीत असताना अचानक सांयकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान बोंडगावदेवी येथे मेघगर्जनेसह व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आला.अशातच विज पडुन भुमिता भुमेश्वर लंजे ह्या घटनास्थळीच कोसळल्या. लागलीच त्यांना ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे हलविण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी मृत घोषीत केले.याबाबत अर्जुनी मोर. पोलीसांनी पंचनामा केला.तसेच तलाठी राठोड यांनी ही पंचनामा केला. लगेच शवविच्छेदन करण्यात आले. मृतक महिलेच्या मृत्युपश्च्यात सासु,पती, दोन अविवाहित मुली, एक मुलगा व बराच मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार ता.7 जुनला सकाळी आठ वाजता बोंडगावदेवी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.