गंगाबाई रुग्णालयात गर्भवती मातेचा मृत्यू

0
17

गोंदिया,दि. २८ : महिलांकरिता जिल्ह्यातील एकमेव बाई गंगाबाई रुग्णालयात उपचाराकरिता येणाèया मातांचा मृत्यूशी चाललेला खेळ थांबता थांबत नाही. या रुग्णालयात प्रसुतीकरिता आलेल्या गर्भवती मातेचा उपचाराअभावी सोमवारी(ता.२७) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
एकेकाळी बाई गंगाबाई रुग्णालय म्हणजे गोंदिया जिल्हाच नव्हे, तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील महिला सुरक्षीत प्रसुतीकरिता येथे येत होत्या. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून या रुग्णालयाला दृष्ट लागली. माता आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले. रुग्णालयात कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाèयांचा राबता असला तरी, प्रत्यक्षात रुगणसेवा दिवसेंदिवस ढेपाळत चालली, हे वास्तव नाकारता येणार नाही. सोमवारी(ता.२७) कविता रेखलाल हरदुले(वय २५, रा. माकडी) ही गर्भवती माता प्रसुतीकळा आल्यामुळे रुग्णालयात दाखल झाली. त्यापूर्वी तिच्यावर प्राथमिक आरोग्य रुग्णालयात उपचार सुरू होता. तिची प्रकृती खालावल्यानंतर तेथील डॉक्टरांनी बाई गंगाबाई रुग्णालयात आल्यानंतर दाखल करण्यास उशीर करण्यात आल्याचा आरोप मृत महिलेच्या नातलगांनी केला. महिला रुग्णाला वैद्यकीय अधिकारी श्री ठाकूर यांनी तिला दाखल करवून घेतले. दाखल केल्यानंतर तिची प्रकृती खालावली. तिच्या रक्ताची तपासणी केली असता तिच्या शरिरात हिमोग्लोबिन फक्त आठ ग्रॅम होते. तातडीने उपचार सुरू करण्यात आला. परंतु, त्या महिलेचा मृत्यू झाला.
गंगाबाई रुग्णालयात वर्षाकाठी पाच ते सहा हजार प्रसुती होतात. असे असताना येथे अतिदक्षता विभाग स्थापन करण्यात आले नाही. परिणामी रुग्णांना असलेल्या उपचारावरच समाधान मानावे लागले. गंगाबाई रुग्णालयात ६ प्रसुतीतज्ज्ञ आहेत. मात्र, त्यातील काहीच डॉक्टर उपस्थित असतात. इतर डॉक्टरांनी स्वतःचे खासगी दवाखाने थाटले,तर काही समाजसेवेच्या नावावर अधिकारी,लोकप्रतिनिधी यांच्या मागेपुढे फिरून फोटो काढून आपली खुर्ची वाचविण्यातच मग्न असतात.तर काही दुसर्या डाॅक्टरचे कसे चुकते तो कसा भ्रष्टाचार करतो यातच वेळ वाया घालवितात परंतु रुग्णांना चांगली सेवा देऊ असे मात्र एकही डाॅक्टर या रुग्णालयातील म्हणत नाही.