डॉ. आंबेडकरांची वास्तू पाडल्यावरून रोष – रास्तारोको, मोर्चा

0
3

गोंदिया, दि. २८ : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वास्तू २४ जून रोजी पाडण्यात आली. या घटनेचे पडसाद गोंदियात उमटू लागले. घटनेचा निषेध आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना सोमवारी(ता.२७) निवेदन देण्यात आले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वास्तू पाडल्याच्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने उद्या(ता. २९) रास्ता रोको आणि मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवाराम मेश्राम, समता सौनिक दलाचे जितेंद्र मेश्राम यांनी दिली.
निवेदनात म्हटले की, २४ जून रोजी रात्री अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान असा‘ाजिक तत्वांनी रत्नाकर गायकवाड नावाच्या व्यक्तीला पुढे करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई येथील वास्तू जमीनदोस्त केली. याच इमारतीत भारिप बहुजन महासंघ, समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेची कार्यालये होती. या संघटनांचा प्रभाव वाढत असल्यामुळे इमारत पाडण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.