अमृतवृक्ष मोहिमेत पोलीस मुख्यालयात वृक्षारोपण

0
11

भंडारा,दि.07 : जिल्हयात अमृतवृक्ष मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असुन आज पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.त्यामध्ये देशी झाडांमध्ये वड,पिंपळ,चिंच,आवळा बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस ,आवळा ,आंबा , कडुनिंब ,मोह, पळस शिसव, पांगारा, सावर, सीताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज,कवठ, बेल, या स्थानिक झाडांची रोपे लावण्यात आली.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,पोलीस अधिक्षक लोहीत मतानी ,उपवनसंरक्षक राहूल गवई,सामाजिक वनीकरणचे आर.टी मेश्राम उपस्थित होते.

यावेळी जिल्हयात अमृतवृक्ष योजनेत एक पेड मॉ के नाम या संकल्पनेनुसार सर्व नागरिक,सामाजिक संघटनानी वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्यावा तसेच जास्तीत जास्त रोपांची लागवड करावी.15 सप्टेंबरपर्यत ही मोहीम असुन अमृतवृक्ष आपल्या दारी यात लागवड केलेल्या रोपांची माहिती व फोटो अमृतवृक्ष या मोबाईल ॲपमध्ये देता येईल.

गेल्या महीन्यातच पलाडी येथे ही या योजनेअंतर्गत झाडे लावण्यात आली होती. देशी झाडांच्या पिकलेल्या पानांतून जमिनीवर जमणार्या पालापाचोळयातून तयार होणार्‍या सेंद्रीय खतातून जमिनीचा कस वाढण्यास मदत होते. विघटन झालेल्या पालापाचोळ्याच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये जमीनीचा पोत वाढवतात.झाडांमुळे हवा शुद्ध होते आणि  वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

15 जून ते 30 सप्टेंबर या काळात ,शासकीय निमशासकीय, हरित सेना शाळा, ग्रामपंचायत, इतर यंत्रणेला सामाजिक वनीकरणाव्दारे मोफत रोपे वाटप करण्यात आले आहे.

विविध शासकीय ,निमशासकीय कार्यालय ,ग्रामीण भागात त्या,चप्रमाणे शाळा, महाविद्यालय ,परिसरात उपक्रमाची जनजागृती  या मोहिमेविषयी जनजागृती करण्यात आली.