अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या उड्डाण पूलाची भिंत कोसळली

0
1701

गोंदिया,दि.१० : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ नागपूर-रायपूर-कोलकत्ता महामार्ग  गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी व देवरी तालुक्यातून जात असून या मार्गावर जंगलपरिसरात उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे.मात्र या उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ठ होत असल्याने नागरिकांना व प्रवाशाना त्रास सहन करावा लागत असून अशाच एका उड्डाणपुलाची भिंत सर्विसमार्गाच्या बाजून कोसळल्याने अग्रवाल ग्लोबल कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे.

काही दिवसापूर्वी याच भागातील उड्डाण पूलाला मोठे भगदाड पडले होते. या कंपनी मार्फत सुरू असलेले नव निर्माण कार्य किती निकृष्ठ दर्जाचे होत आहे, यावरून दिसून येते.उड्डाण पुलाच्या बांधकामात पावर प्लाँँट मधून निघणाऱ्या राखेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आले.त्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने ती सर्व राख आता बाहेर येऊ लागल्याने नव निर्मित उड्डाण पुलाची भिंतच खाली कोसळली.