■ या दिनानिमित्य आमदार कोरोटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार वाटप.
देवरी,ता.१० : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरीच्या वतीने शुक्रवार (ता.०९ ऑगस्ट) रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन व स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त विद्यार्थ्यांना विविध पुरस्काराचे वाटप करण्यात आले. दरम्यान या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आदिवासी समाज बांधवांच्या सुविधेसाठी मोबाईल अँपचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी आमदार कोरोटे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.यावेळी प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके, आदिवासी काँग्रेस कमेटी प्रदेशचे सचिव मोतीलाल पिहदे, पं.स. सदस्य प्रल्हाद सलामे, सहा. प्रकल्प अधिकारी विनोद गायकवाड, सहा. प्रकल्प अधिकारी साईली चिखलीकर, दिनेश कुंभरे, नगरसेविका कौशल्या कुंभरे, अनवंता आचले, छाया मडावी तसेच अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी तसेंच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.