तिरोडा आयटीआयच्या 70 विद्यार्थांना ईडीमध्ये शून्य गुण

0
16

11213आमदार रहागंडालेंच्या पुढाकाराने निकाल मागविला
तिरोडा,दि.11-तिरोडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यानी आज सोमवार(दि.11)ला निकालाला तसेच न्याय देण्याच्या मागणीला घेऊन विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करुन नारेबाजी केली.या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आयटीआय तृतीय वर्गाच्या विद्यार्थ्यांचा परिक्षेचा निकाल लागला असून ईडी या विषयात सर्वच 80 विद्यार्थांना शून्य गुण मिळाल्याने एकच खळबळ मिळाली.त्यावर विद्यार्थ्यांनी प्रार्चायाकडे आक्षेप नोंदविला.परंतु प्रशासन एैकायच्या मनस्थितीत नसल्याने तसेच निकालाची व्यवस्थित माहिती न देता परिक्षा फार्मसह परिक्षा शुल्क भरण्याची शक्ती प्राचार्य करीत असल्याने (ईडी)अभियांत्रिकी चित्रकला विषयात शून गुण मिळालेल्या 70 विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याची माहिती नितेश पाटील,शुभम नागदेवे,लोकेश टेंभरे,मंगेश पटले,शिवकुमार पटले,संतोष ठाकूर या विद्यार्थ्यांनी बेरार टाईम्सला दिली.त्यांनतर या विद्यार्थ्यांनी तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांची भेट घेऊन निवेदन दिले.आमदार रहागंडाले यांनी लगेच गांर्भीयाने लक्ष देत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक दयानंद मेश्राम व सहसंचालक योगेश पाटील यांच्याशी चर्चा करुन प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले.त्यावर संचालक यांनी सदर चूक ही दिल्ली व्हीसीएनटी येथील सा्प्टवेयरमूळे झाल्याचे सांगून दूरुस्त करुन विद्यार्थांना निकाल देण्यासाठी निकाल मागविण्यात आल्याची माहिती दिली.आमदार रहागंडाले यांनी पुढाकार घेतल्याने आयटीआयच्या 70 विद्यार्थांचे होणारे नुकसान मात्र टळले.
गुणपत्रिकेत ईडी विषयाचे शून्य गुण येत असल्याने आयटीआय प्रशासनाचीही तारांबळ उडाली होती.दरम्यान आयटीआयचे प्राचार्य तिवारी यांनी सांगितले की गुणपत्रिकेवर शून्य गुण येत असल्याची माहिती दिल्ली स्थित मंडळाच्या कार्यालायला देऊन त्या विषयाचे गुण मागवून घेण्यात आले आहेत.ते गुण गुणपत्रिकेवर लिहून विद्यार्थांना देण्यात येणार असल्याची माहिती दिली.निकालाला घेऊन विद्यार्थ्यांनी सकाळी थोडा गोंधळ घातला परंतु त्यांची समजूत काढून त्यांना पूर्ण निकाल देण्यात येणार असल्याचे सांगितल्याचेही म्हणाले.