नाल्यात वाहून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला

0
9

गोंदिया,दि.11 :- जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे काही नद्या नाल्यांना चांगलाच पुर आलेला आहे.अशाच एका कमी उंची असलेल्या गोंदिया शहरातील संजयनगर परिसरातील नाल्यावरून रस्ता ओलाडंताना वाहून गेलेल्या १४ वर्षीय अमित वैद्य या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे.प्रत्यक्षदर्शीनी पोलिसाना दिलेल्या माहितीनुसार दिली असून वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह शोध घेत असताना दोन दिवसानंतर घटना स्थळावरून १५ किमी दूर असलेल्या टेमनीनजीकच्या पांगोली नदी पात्रात आज सोमवारला आढळून आला.अमित हा ईद निमित्त गोंदियातील फुलचूर भागात असलेल्या आपल्या मित्राकडे गेला होता. मात्र परत जात असताना रिमझिम पासून सुरू झाल्याने अमितने फिरून जाण्यापेक्षा कमी वेळात घरी पोहचेल म्हणून जवळचा रस्ता निवडला.मित्राने विरोध करूनही त्या रस्त्याने जाऊ नको असे सांगितल्यावरही अमित मनमानी करीत पूलावर पाणी असतानाही सायकलने गेला पण पुलावर पाणी अधिक असल्याने तो सायकलसह वाहून गेला. सदर नाल्सयावर सहा महिन्याआधीच कमी उंचीचा पूल बांधण्यात आला असून संजयनगर वासियांनी पुलाची उंची वाढविण्याची मागणी त्यावेळीच केली होती.परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.