डॉ. मुखर्जी मानवतेचे उपासक : जनबंधू

0
9

गोरेगाव,दि.11-नेहरू युवा केंद्र गोंदिया युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार आणि बंधू शिक्षण प्रसारक मंडळच्या संयुक्तवतीने ग्रा.पं. कार्यालय गणखैराच्या सभागृहात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधू होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेहरू युवा केंद्राचे प्रभारी जिल्हा युवा समन्वयक धर्मलाल धुवारे, ग्रामसेवक एस.जे. परमार, आधार महिला मंडळाचे सचिव वर्षा जनबंधू, युवराज राऊत उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून पुष्पराज जनबंधू म्हणाले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशासाठी काहीतरी नवीन करण्याची स्वच्छेने राजकारणात प्रवेश केला. डॉ. मुखर्जी खèया अर्थाने मानवतेचे उपासक आणि सिद्धांतवादी व्यक्तीमत्वाचे धनी होते. प्रमुख पाहुणे ग्रामसेवक जे.एस. परमार यांनी आपल्या भाषणातून त्यांच्या जीवनात घडलेल्या एका प्रसंगाची माहिती सांगतांना म्हाणाले की, मुस्लीम लीगच्या राजकारणापासून बंगालचे वातावरण दुषित होत होते. तेथे सांप्रदायीक विभागनेची वेळ आली होती. अशा विषम परिस्थितीतही पाऊल उचलून बंगालच्या qहदूची उपेक्षा होऊ दिली नाही. आपली विशिष्ट रणनीती आखून बंगालच्या विभागनासाठी मुस्लीम लीगच्या प्रयत्नांना नाकाम केले. वर्षा जनबंधू यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गावातील महिला पुरुष व युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थितत होते. कार्यक्रमाचे संचालन एन.वाय.सी. किरण पारधी यांनी केले. तर आभार प्रेम गौेतम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंधू शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आधार महिला मंडळाचे पदाधिकारी, सदस्यगण यांनी अथक परिश्रम घेतले.