पहिली आॅटोमॅटिक टिकिट व्हेंडिंग मशीन गोंदियात

0
13

गोंदिया,दि.15-आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात जग समोर जात असताना रेल्वे विभागातही आधुनिकीकरण व्हावे म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकावर आॅटोमॅटिक टिकिट व्हेंडिंग मशीन लावण्यात आली आहे.याच आॅटोमॅटिक टिकिट व्हेंडिंग मशीनचे आणि होम शेड प्लॅटफॉर्म १ चे उदघाटन भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे रेल मंडळ प्रबंधक अमित अग्रवाल आणि अर्जुन सिब्बल,स्टेशन प्रबंधक यांच्या उपस्थिती करण्यात आले.
त्यामुळे तासन तास रांगेत लागून रेल्वे टिकिट खरेदी करणाऱ्या प्रवाश्यांना दिलासा मिळणार आहे. नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे स्थानक हे आॅटोमॅटिक टिकिट व्हेंडिंग मशीन लावणारे पाहिले रेल्वे स्थानक आहे .पूर्व विदर्भाच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्ह्याला लागूनच मध्यप्रदेश छत्तीसगढ राज्याच्या सीमा आहेत. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावरून दर रोज हजारोच्या संख्येत प्रवासी प्रवास करतात. पण कधी कधी गर्दीमुळे टिकिट वेळेवर न मिळाल्याने प्रवाश्यांना प्रवास करता येत नाही. अशा प्रवाश्यांना या आॅटोमॅटिक टिकिट व्हेंडिंग मशीनचा फायदा होणार आहे. याकरिता प्रवाश्यांना पहिल्यांदा ७० रुपये देऊन रेल्वे टिकिट ‘एटीव्हीएम’ कार्ड खरेदी करावा लागेल. त्यात ५० रुपये ठेव रक्कम जमा राहील तर २० रुपयाचा रिचार्ज तुमच्या कार्डमध्ये शिल्लक राहील. त्यानंतर २० रुपया पासून ९५०० रुपयापर्यंत सोयी नुसार रिचार्ज करून पुढील प्रवासाचे टिकिट खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे एटीव्हीएम कार्ड द्वारे टिकिट खरेदी करणाऱ्या कार्ड धारकांना ५ % कमी दराने टिकिट मिळेल त्यामुळे वेळेची आणि पैश्याची बचत होणार, सोबचतच ज्या प्रवाश्यांना या मशीनच्या माध्यमातून टिकिट खरेदी करायचा असेल आणि ज्यांच्या जवळ एटीव्हीएम कार्ड नसेल असेल अशा प्रवाश्यांना देखील या एटीव्हीएम मशीनच्या माध्यमातून १ रुपये अतिरिक्त मोजून टिकिट घेता येणार आहे. सद्य परिस्थितीत गोंदिया रेल्वे स्थानकावर दोन मशीन लावण्यात आल्या असून या करीता दोन चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.