निस्वार्थ समाजसेवी अशोकभाऊंचा हृद्यस्पर्शी नागरी सत्कार

0
23

ak2गोंदिया,दि.15:आयुष्याच्यी 40 वर्ष निस्वार्थपणे समाजासाठी वाहतानाच सामाजिक कार्य करतेवेळीच विद्यार्थी जिवनापासून राजकारणात सक्रिय राहिलेल्या अशोकभाऊ इंगळेना तसा राजकीयच नव्हे तर सामाजिक कार्याचा वारसा हा घरातूनच मिळाला.आपल्या आईबाबांच्या विचारांना त्यांनी कधीच तळाजाईल असे काम न करता समाजासाठीच आपला जन्म झाला आहे असे ब्रिद स्विकारणारे आमचा अशोकभाऊ म्हणजे निस्वार्थ समाजसेवेचे प्रेरणास्त्रोत असल्याचे भावनिक उदगार गोंदियाचे आमदार गोपाल अग्रवाल यांनी काढले.ते श्री अशोक इंगळे नागरीक सत्कार समारोह समितीच्यावतीने जिल्ह्यातील वरिष्ठ समाजसेवी व माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांचा ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून १४ जुलै रोजी आयोजित अशोकराव इंगळे नागरिक सत्कार समारोहाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष खासदार नाना पटोले होते.तर प्रमुख अतिथि म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, मध्ळप्रदेशचे कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन,माजी मंत्री सुधाकरराव गंणगणे, केवलचंद जैन,आमदार राजेंद्र जैन,आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम,राजे मुधोजी भोसले, महेश पुरोहित,माजी आमदार हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, भेरसिंह नागपुरे,भजनदास वैद्य,माजी.जि.प.अध्यक्ष अॅड.के.आर.शेंडे,नेतराम कटरे,माजी नगराध्यक्ष दामाेदर अग्रवाल,भंडाराचे माजी नगराध्यक्ष बशीरभाई,विनोद अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
अग्रवाल पुढे म्हणाले की अशोकराव हे माझे वर्गमीत्र आम्ही दोघेही सखे.विरोधी राजकीय पक्षात असलो तरी पारिवारिक मतभेद आमच्यात कधीच राहिले नाही.विशेष म्हणजे त्यांच्या आईबाबांनीही समाज आणि शहराला प्राधान्य ठरवित नंतर कुटुंबाचा स्वार्थ ठेवला असे आईवडिल मिळणेही कठीण आहे.गेली 40 वर्षापासून आम्ही मित्र असून काँग्रेसच्या काळापासून मित्र आहेत आज विरोधी पक्षात आहेत.परंतु जेव्हा काही महिन्यापुर्वी माझ्याशी एक घटना घडली तेव्हा रुग्णालयात मला भेटायला आलेला माझा मित्र अशोक बघून बरे वाटले हीच त्यांच्या कार्याची पुण्याई असल्याचे ते म्हणाले.यावेळी नागरी सत्कार समितीच्यावतीने अशोकभाऊ आणि त्यांच्या धर्मपत्नींचा समितीच्यावतीने स्मृतीचिन्ह,शाल श्रीफळ आणि पुष्पगृच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच त्याच्या जिवनकार्यावरील झुंज या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.rj
मध्यप्रदेशचे कृषीमंत्री गौरीशंकर बिसेन यांनीही आपले अशोकभाऊंशी संबध खुप जूने असून राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत हे आमच्यासाठी मार्गदर्शक ठरले आहे.सिव्हीललाईनच्या भागात आपले आधीपासूनचेच संबध असल्याने त्यांच्याशीही मैत्रित्वाची नाळ जुडली आणि आजतागायत ती टिकून असून त्यांच्या उज्वल जिवनाला शुभेछ्चा देत असे निष्कर्म,निस्वार्थ मित्र सर्वांनाच लाभो असे विचार व्यक्त केले.गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आपला जरी त्यांच्याशी संबध पुर्वी आला नसला तरी गेल्या दहा पंधरा वर्षात जे काही त्यांच्याशी संबध आला आणि त्यांचे कार्य बघून खरच आपण आपल्याही आयुष्यात काहीच करु शकलो नाही असे म्हणाले.त्यांच्या कार्याचा सत्कार हा खरा हृद्यस्पर्शी सत्कार असून आपण पहिल्यांदाच यशस्वी असा सोहळ्यात सहभागी झाल्याने आनंद झाल्याचा गौरवौदगार त्यांनी काढले.
अामदार राजेंद्र जैन यांनी अाम्ही लहानपणापासूनच अशोकभाऊंना बघितले असून केके सरांनी तर आम्हाला शिकवले आहे.सिव्हील लाईनचा कुठलाही सोहळा असो त्याच्या नियोजनासाठी अशोकभाऊ रात्रदिवंस ज्यापध्दतीने काम करतात आणि त्याचे य़शस्वी आयोजन गोंदिया शहरात कुठेच होत नाही तसे शिस्तबध्द असे कार्यक्रम त्यांनी यशस्वी करुन दाखविले आहे.अशोक आम्हा सर्वांचे लाडके असून गोंदिया शिक्षण संस्थेच्यावतीने आणि खासदार प्रफुल पटेल यांच्यावतीने मनपुर्वक अशोकभांऊंचे अभिनंदन करीत असल्याचे विचार व्यक्त केले.प्रास्तविक समितीचे अध्यक्ष पुष्पक जसानी यांनी केले.संचालन श्रीमती देशपांडे,दुलींचंद बुध्दे यांनी केले.यावेळी गोंदिया,भंडारा जिल्ह्यातील हजारो चाहत्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात वात्सल्यधामच्या मुलांना अशोकभाऊ इंगळे यांच्याहस्ते 11 हजार रुपयाचे धनादेश वितरीत करण्यात आले.

यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे स्वागताध्यक्ष खा.नाना पटोले, अध्यक्ष पुष्पक जसानी, कार्याध्यक्ष सतीश चव्हाण, उपाध्यक्ष विजय सावंत, राजकुमार नोतानी, सचिव लतीफ शेख, दुलीचंद बुद्धे, दीपक कदम, कोषाध्यक्ष झलकqसह बिसेन, बबन येटरे, मार्गदर्शक समितीमध्ये डॉ. सुधीर जोशो, केशवराव पारधी, भरतभाऊ बहेकार, कमल पाराशर, एस.एन. यदुवंशी, विरेंद्र जायस्वाल, पी.व्ही.जोसेफ, लक्ष्मीनारायण गौतम, पुनाजी लिल्हारे, अ‍ॅड.के.आर.शेंडे, डॉ. के.बी. जयपुरिया, डॉ. दीपक बहेकार, डॉ. प्रदीप गुजर, सतीश राऊत, डॉ. पुरोहित, छोटेलाल दुबे, राजू वालिया ,रवि हलमारे मनोहर ठाकुर, राजकुमार यादव, शंकर शहारे, जीवन लंजे, भरत क्षत्रीय, बटर पठान, पप्पू अरोरा, महेश आहूजा, संजय इंगळे, अशोक यादव, देवेश मिश्रा, मनोज मेंढे, नवरतन अग्रवाल, गप्पू गुप्ता, सतीश देशमुख, गोपाल अवस्थी, अजय जायस्वाल, एस.ए.वहाब, मुरलीधर माहोरे, अनिल देशमुख, ब्रजेश श्रीवास्तव, राजेश कनोजिया, राजेश चतुर, डॉ. घनश्याम तुरकर, दीपक पटेल, लिखेंद्र बिसेन, बिट्टू टेहरा, सुनील तिवारी, जयंतीभाई वस्तानी, टेकचंद फेंडारकर, अमृत इंगळे, दुर्गेश रहांगडाले, सुनील अग्रवाल, प्रशांत बोरकुटे, डॉ. रोशन कानतोडे, अनिल काळे, बाल्या केकत, राजा कदम, योगराज रहांगडाले सहकार्य केले.