आठवले महाविद्यालया वेगळ्या विदर्भावर चर्चासत्र

0
11

भंडारा,दि.22-येथील आठवले समाज कार्य महाविद्यालयात स्वतंत्र विदर्भ राज्य का? यावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अॅड. वामनरावजी चटप यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.उद्घाटक अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.यावेळी प्रमुख अतिथी महाविदर्भ जनजागरणचे नितीन रोंघे व भंडारा जिल्हा प्रभारी माजी आमदार अॅड आनंदरावजी वंजारी, जिल्हा युवाध्यक्ष तुषार हटेवार, अर्जुन सुर्यवंशी, दामोदर क्षीरसागर, कार्यक्रमाचे आयोजक चंदनसिंग रोटेले, महाविद्यालयाचे संचालक केदारसिंग रोटेले उपस्थित होते. माजी आमदार अॅड आनंदरावजी वंजारी यांनी प्रास्ताविकातुन शेतकऱ्यांच्या आत्महत्ये मागे शासनाची सिंचन प्रतीची उदासिनता जबाबदार असून गोसेखुर्द, बावनथडी सारखे प्रकल्प अजुनही रखडले आहेत. नितीन रोंघे यांनी विदर्भातील युवकांनवर कश्या प्रकारे नोकऱ्यांमध्ये अनुशेष व अन्याय सहन करावा लागत आहे. डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे होणारे फायदे, अर्थिक, भौगोलिक संपत्तिने विदर्भ हा कसा समृद्ध आहे,यावर मार्गदर्शन केले. अॅड. वामनरावजी चटप यांनी अध्यक्षीय भाषणात राजकीय हेतूसाठी विदर्भाच्या प्रश्नांकडे कशाप्रकारे दुर्लक्ष केले जात आहे,याची माहिती दिली.तसेच विदर्भ मिळवायचे असेल तर हीच एक सुवर्ण संधी असुन विदर्भाचा लढ्यात युवकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. कारण उद्याचे विदर्भाचे नेते व धुरा युवकांच्या खांघावर राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी भारत चौधरी, मयुर निंबार्ते, सारंग तिडके, राहुल बांते, आशिषकुमार मेश्राम, प्रवीण बनकर, निकेश रेहपाडे, सचिन बोंद्रे, पुजा बालपांडे, सुरेखा गायधने, रोहिणी बांगळकर, महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षक, शिक्षकेतर वर्ग कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. सी. पी. मालवीय व आभार डॉ. आरती पवार यांनी व्यक्त केले.