डायरियाने घेतला बालिकेचा बळी

0
9

सालेकसा,दि.4 : साखरीटोल्यापासून २ किमी अंतरावरील कवडी (ता.आमगाव) येथील खुशी चंद्रभान चौधरी (३) ही उलटी व हागवणीनेच्या आजाराने दगावली. सदर घटना ३ ऑगस्ट रोजी घडली.
दि.२ ऑगस्टला सदर मुलीची प्रकृती बिघडली होती. तिला उलटी व हागवण सुरू झाली होती. त्यामुळे साखरीटोला येथील खाजगी डॉक्टरकडे उपचाराकरीता नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने संबंधीत डॉक्टराने गोंदिया येथे उपचाराकरिता परत पाठविले. १0८ क्रमांकाच्या गाडीने गोंदियाला नेण्यात आले होते, परंतु सदर मुलगी दि.३ ऑगस्टला दगावली. तिला नेमका कोणता आजार झाला हे निश्‍चित नसले तरी डायरिया किंवा निमोनियाची शंका उपस्थित करण्यात येत आहे.