गोल्डन किड्समध्ये लाखोंचा घोटाळा; अाप

0
5

अमरावती- लेडी यशोदाबाई लेडीज क्लब द्वारे संचालित गोल्डन किड्स इंग्रजी प्राथमिक, गोल्डन किड्स मराठी प्राथमिक, गोल्डन किड्स मराठी माध्यमिक, गोल्डन किड्स इंग्रजी माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, या घोटाळ्याला वाचा फोडण्यासाठी येत्या आॅगस्ट पासून गोल्डन किड्स शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेपुढे बेमुदत उपोषणाला बसणार असून या आंदोलनाला आपचा जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

संस्थेच्या सचिव हर्षदा पांडे यांनी संपूर्ण संस्थेवर ताबा िमळवून संपत्ती वाढवणे सुरू केले आहे. नियमांची पायमल्ली करून संपत्ती जमवण्याचे काम सुरू आहे. त्याची संस्था धर्मदाय आयुक्तांकडे कोणतीही नोंद नाही. जेणेकरून भविष्यात संपत्तीवर ताबा िमळवता यावा. तसेच त्यांचे पुत्र पराग पांडे हे पालकांकडून अवाजवी शुल्क वसूल करत असतात. त्या तुलनेत शिक्षकांना मात्र फारच कमी मानधन िदले जाते, असा ठपकाही आपद्वारे ठेवण्यात आला आहे.

अनेक खासगी शिक्षण संस्था दर्जेदार शिक्षण देण्याच्या नावावर पालकांचे आर्थिक शोषण करीत असून, ही संस्थाही त्याचाच एक भाग आहे. पालकांकडून अमाप शिक्षण शुल्क वसूल करणाऱ्या या संस्थेच्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा आरोप गोल्डन िकड्स शाळेतील शिक्षक आपचे कार्यकर्ते िकरण गुडधे यांनी केला आहे.