समन्वय आणि सकारात्मकतेतुन जिल्हयाचा विकास घडवा – खासदार नेते

0
7

जिल्हा विकास समन्वय संनियंत्रण समितीची सभा
गडचिरोली,दि.14: सर्व अधिकाऱ्यांच्या समन्वयातुन आणि सकारात्मक भुमिकेतून जिल्हयात विकास कामे होणार आहेत. कर्मचारी कमी आहेत याची जाणीव आपणास आहे. तरी सर्वांनी पुढाकार घेऊन कामे करावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी आज येथे केले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची पहिली सभा शनिवारला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, माजि जिल्हा परिषद अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, सर्व कार्यालय प्रमुखांची उपस्थिती होती .
केंद्र शासनाच्या विविध योजना जिल्हयात राबविण्यात येत आहेत. त्यात आदिवासी बहूल अशा गडचिरोली जिल्हयात विकास कामे राबविण्यात भौगोलिक अडचणी आहेत. त्यावर मात करुन पुढे जाण्याची गरज आहे असे नेते म्हणाले.
जिल्हयात पेसा गावे तसेच वनहक्क पट्टयाची कामे चांगली सुरु आहेत. विविध योजनातुन स्थानिकांना अधिक प्रमाणात रोजगार निर्माण करता यावा यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असेही ते म्हणाले.